आवृत्ती पुणे

पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे व गोरख दरेकर यांचा सन्मान

शिवसेनेच्यावतीने सन्मान : पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे आणि पोलीस निरीक्षक गोरख दरेकर यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहर उपाध्यक्ष शिवाजी पवार, राहुल भालेकर, अभिजित म्हसवडे, अनिल खैरे, आनंद अवचिते, रियाज शेख, … Read more

युवकांमधील उर्जेचा वापर सकारात्मकतेने व्हावा

अमित वर्दे व पंकज पिपाडा : पोलीस उपायुक्त परिमंडल-१च्या वतीने विधिसंघर्षित बालक मेळावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पंधरा ते वीस वयोगटातील युवकांकडे मोठी ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर सकारात्मक दृष्टीने वापरला गेला पाहिजे, यासाठी पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे, असे मत कोरेगाव पार्क येथील लाइफ स्कूल फाउंडेशनचे अमित वर्दे व पंकज … Read more

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड होण्यासाठी दिली १०० पुस्तके

अमोल काटे : बिबवेवाडीमध्ये शिवजयंतीनिमित्त जाणिव फाउंडेशनचा उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे सोशल मीडिया, दूरचित्रवाणीमुळे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे. मात्र, विद्यार्थीदशेमध्ये वाचनाची आवड असली पाहिजे. पुस्तक आपला चांगला मित्र आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांना १०० पुस्तके दिल्याचे जाणिव फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले. बालशिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बिबवेवाडीतील अंकुश मित्र मंडळ, … Read more

११ महिने पोलिसांना हुलकावणी देणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

समर्थ पोलिसांची कारवाई : झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ आणि दूधवाल्याच्या भूमिकेतून केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांनी झोमॅटो डिलेव्हरी बॉय आणि दूधवाल्याच्या भूमिकेतून तपास करत मोक्कातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेरांना समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुभम दिपक पवळे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, दत्तवाडीपुणे), आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २२, रा. डुल्या मारुती जवळ, गणेश … Read more

मटका किंगची ‘गेम’ करणारे सहाजण गोत्यात

पोलिसांची दमदार कामगिरी – पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपीला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज परिसरातील मटका व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून खून करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आर्थिक वादातून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी खुनाचा उलगडा करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी दमदार कामगिरी करत आरोपींना पुण्यातील … Read more

तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा

येरवडा पोलिसांची कारवाई : वडगावशेरीतील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भावाला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत गुंडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगावशेरी येथील वॉटर बे सोसायटीच्या मागील मैदानात रविवारी रात्री सव्वादहा वाजता घडली. आदिल … Read more

इंस्टाग्राम फेक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठविणारा अटकेत

अलंकार पोलिसांची कारवाई : कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाचे अघोरी कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज पाठविणाऱ्याला अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर तिच्याच कंपनीत काम करणार्‍या कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने हे कृत्य करीत असल्याचे आढळून आले. जयमीन … Read more

बंद सदनिका फोडून तीन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगावमधील तान्हाई कृपा बिल्डिंगमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगावमधील तान्हाई कृपा बिल्डिंगमधील सदनिका फोडून दोन लाख ९८ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. तीर्थराज रासकर (वय ५९, रा. आनंदनगर, धानोरी रोड, लोहगाव, पुणे) … Read more

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडकीनाला येथे भरधाव पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला. कृष्णा महादेव बिडगर (वय २०, रा. … Read more

प्रॉपर्टीसाठी सुनेकडून सासर्‍याला बेदम मारहाण

चंदननगर पोलिसांत फिर्याद : चंदननगरमध्ये मालमत्तेच्या वादातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मालमत्तेच्या वादातून अनेक घरात वादावादी, भांडणे सुरु असल्याचे दिसून येते. मात्र, चंदननगरमध्ये एका ३२ वर्षाच्या सुनेने प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या ७५ वर्षांच्या सासर्‍याला फरशी पुसण्याच्या पोच्याच्या दांडीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ८ वाजता … Read more