आवृत्ती , पुणे

टास्कसाठी गुंतवणूक करणे पडले २३ लाखाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी मोबाईल धारकाने टास्कसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून २३ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेने (वय २९ वर्षे रा. साईनाथनगर वडगाव शेरी, पुणे) चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांना व्हॉट्सअप द्वारे व त्यानंतर टेलिग्रामद्वारे टास्क साठी गुंतवणूक करणे आहे, … Read more

गुजरवाडी फाट्यावर पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सातारा रोड गुजरवाडी फाटायेथे पीएमपी बसच्या कंडक्टरला मारहाण करण्याची घटना २६ जून रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बस वळवण्याकरता खाली उतरुन चालकास मार्गदर्शन करत असताना रोडवर थांबलेल्या इसमांना बस वळत आहे तुम्ही बाजुला थांबा असे सांगीतले. त्याचा … Read more

भांडण मिटवताना महिलेचा विनयभंग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती-पत्नीचे भांडण सुरु असताना ते सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाने महिलेशी असभ्य बोलून विनयभंग केल्याची घटना कोडीत (ता. पुरंदर) येथे घडली आहे. ही महिला काम करत असलेल्या ठिकाणी येऊन तिच्यासोबत या तरुणाने गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

मुंबईत शनिवारी दूध दराबाबत महत्वाची बैठक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार २९ जून २०२४ रोजी मुंबईत विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे … Read more

सशस्त्र सेनेतील जवानांसाठी रक्तदान शिबीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सशस्त्र सेनेतील जवान आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ९० रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. … Read more

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव

त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध: उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे,सचिव पदी पी.टी.पाटील, सहसचिव पदी ए.पी.देबडवार व खजिनदार पदी जे.सी.शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी १७ – अर्ज दाखल झाल्याने सर्व संचालकांची … Read more

पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची राहणार नजर

वारकऱ्यांच्या वेशात पोलीस सहभागी होणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्रीक्षेत्र देहू येथून जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २८) प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. २९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि. ३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होतील. पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची नजर … Read more

युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

650 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. करिअर मार्गदर्शन शिबिरात 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगाराची व कौशल्य विकासाची माहिती देण्यासाठी शासनाच्या तसेच विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 7 स्टॉल लावण्यात आले होते. 450 उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला. … Read more

भोसरीमध्ये कॉन्ट्रॅक्टरला टोळक्याने केली मारहाण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंडांच्या टोळक्याने लेबर कॉन्ट्रॅक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना भोसरी येथील उड्डाणपुलाच्या खाली मंगळवारी दि. २५ दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली आहे. अरबाज पठाण (रा. भोसरी), शदाब पठाण, सायबाज पठाण, यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश ओव्हाळ हे त्यांच्या मित्राशी चर्चा करत होते. शदाब पठाण याने … Read more

रिवॉर्ड पॉइंट रिडीमच्या नादात ज्येष्ठाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांनी घोरपडी परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ही फसवणुक झाली आहे. याबाबत अनिल प्रभाकर महाबोले (वय ६५, रा. वाघोली) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जून २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी … Read more