महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पती-पत्नीचे भांडण सुरु असताना ते सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाने महिलेशी असभ्य बोलून विनयभंग केल्याची घटना कोडीत (ता. पुरंदर) येथे घडली आहे.
ही महिला काम करत असलेल्या ठिकाणी येऊन तिच्यासोबत या तरुणाने गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन योगेश दशरथ खुटवड (वय-30 रा. कोडीत ता. पुरंदर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सासवडचे पोलीस तपास करीत आहेत.
