महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे सातारा रोड गुजरवाडी फाटायेथे पीएमपी बसच्या कंडक्टरला मारहाण करण्याची घटना २६ जून रोजी सायंकाळी घडली आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बस वळवण्याकरता खाली उतरुन चालकास मार्गदर्शन करत असताना रोडवर थांबलेल्या इसमांना बस वळत आहे तुम्ही बाजुला थांबा असे सांगीतले.
त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करून धारधार शस्त्राने पाठीवर व डाव्या हाताचे बोटावर मारुन जखमी केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चेतन संजय भालेराव (वय २६ वर्षे रा. मांगडेवाडी कात्रज पुणे) २) व आर्यन रविंद्र शिंदे (वय-१८ वर्षे रा. दांडेकर पुल-पुणे) यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस. उप. निरीक्षक. रतिकांत कोळी करीत आहेत.
