महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी मोबाईल धारकाने टास्कसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून २३ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एका महिलेने (वय २९ वर्षे रा. साईनाथनगर वडगाव शेरी, पुणे) चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांना व्हॉट्सअप द्वारे व त्यानंतर टेलिग्रामद्वारे टास्क साठी गुंतवणूक करणे आहे, असे सांगून एका टेलिग्राम आयडीला जॉईन होण्यास सांगून.
त्यांच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये २३,८३,४६१/- रू ऑनलाइन पद्धतीने भरण्यास भाग पडले वफिर्यादीचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपासपोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजीतवाड करीत आहेत.
