हडपसर पोलिसांची कारवाई : पाच लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दोन वाहनचोरांना अटक करून हडपसर पोलिसांनी अटक करून पाच लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडून हडपसर-८, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, जेऊर (सोलापूर) पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ऋषिकेश महादेव मोहिते (वय १९, रा. कॉलनी नं.३, डी.पी. रोड, माळवाडी, हडपसर, मूळ रा. मु.पो. शेळगाव (मुक्ताबाई), ता.इंदापूर, जि. पुणे) आणि ऋषिकेश नागेश रोहिटे (वय १९, रा. कदमवाकवस्ती, मराठी शाळेजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास करीत होते. दरम्यान वाहनचोरीतील आरोपींविषयी पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपींकडून ११ गाड्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपी बनावट चावी आणि हँडललॉक तोडून गाड्या चोरून नेत असल्याचे तपासात उघडकीस आले.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाकाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसोडे, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सूरज कुंभार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.