सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : पाच हजार ७०० रुपये जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा परिसरातील चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 हजार 700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. ही कारवाई सिद्धार्थनगर मच्छीमार्केटच्या पाठीमागे, कबूतर बिल्डींग येरवडा येथे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे.
शंकर शेट्टी (रा. ताडीवाला रोड, पुणे), अजय गायकवाड, कुमार सोनवणे, रविंद्र भगत, हरिचंद्र धोत्रे, पांडुरंग लोखंडे, विलास शिंदे (सर्व रा. येरवडा) विश्वनाथ सपकाळ (रा. चिंचवड) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सिद्धार्थनगर मच्छीमार्केटच्या पाठीमागे, कबूतर बिल्डींग येरवडा येथे जुगार खेळत आणि इतरांना खेळवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. त्यानूसार 25 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांच्यासह सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस पथकाने छापा मारला. या कारवाईमध्ये जुगाऱ्यांना अटक करुन 5 हजार 700 रुपये रोख रक्कम तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रताप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
