येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : रामवाडी जकातनाक्याजवळील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आज तेरेको उपर भेजके हिसाब पुरा करूंगा म्हणत पालघनसारख्या हत्याराने वार करणाऱ्या चौघांवर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. रामवाडी जकातनाका येथील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये ३० मार्च २०२२ रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
सोनू शिंदे (वय २६, रा. रामवाडी जकातनाका, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने सोसायटीमध्ये पार्किंग केलेल्या दुचाकी-चारचाकी वाहनांचे आरोपींनी धारदार हत्यारांने तोडफोड केली. तुम्ही गाड्यांची तोडफोड का करता असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ करीत तेरे साथ अपना पुराना हिसाब बाकी है, आज तेरेको उपर भेजके हिसाब पूरा करूंगा असे म्हणून त्याच्या हातातील पाघनसारख्या हत्याराने फिर्यादीच्या मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी मोठमोठ्याने ओरडून आम्हाला कोणीही अडवू शकतनाही, आम्ही येथील भाई आहोत, कोणामध्ये दम असेल तर बाहेर या असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. येरवडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करपे पुढील तपास करीत आहेत.
