डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारणी : आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
नगरसेवक महेश वाबळे यांच्यातर्फे पद्मावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ‘सीसीटिव्ही’ कॅमेर्याची उभारणी करण्यात आली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
पद्मावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणजे पद्मावती परिसरासाठी मानबिंदू असल्याने या पुतळ्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, या भूमिकेतून नगरसेवक महेश वाबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी पुतळ्याभोवती सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. त्याचे उद्घाटन आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुनील ओव्हाळ, राजाभाऊ गरूड, बाळासाहेब जाधव, राहुल गायकवाड तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे परिसर अधिकच सुरक्षित झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
