भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अश्लील मजकूर इतरांना पाठवून केली बदनामी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : इंस्टाग्रामवर तरुणीचे खासगी फोटो अपलोड करीत अश्लिल मजकूर टाकून तो इतरांना पाठवून तिची बदनामी करणाऱ्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिनीशा डागा (रा. गुरुवार पेठ, आंबेजोगाई, बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या इंस्टाग्रामवर सोशल नेटवर्किंग साईटवर फिर्यादीच्या नावाचा व फोटोंचा वापर करुन त्यांचे खासगी फोटो अपलोड केले. त्यावर आरोपीने अश्लिल मजकूर टाकला. फिर्यादी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या मोबाईलवर व इतरांना पाठवून फिर्यादी यांचा विनयभंग करुन बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुराणिक अधिक तपास करीत आहेत.
