विमानतळ पोलिसांत फिर्याद : कलवडवस्ती येथील सोसायटीमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यपान करून इमारतीत धिंगाणा घालणऱ्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून बेदम मारहाण करणाऱ्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. ही घटना लोहगावमधील कलवड वस्ती येथे घडली.
शुभम चिंचोले, रोहन गायकवाड, ऋषीकेश नेवाळे, सुमीत लंगडे, अभि तांबे अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी अमित रजक (वय ३८ रा. आंबेडकर चौक, येरवडा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अमित सुरक्षारक्षक असून, रात्री साडेआठच्या सुमारास ते कामावर हजर होते. त्यावेळी शेजारील सदनिकेमध्ये चार-पाचजण मद्यपान करून धिंगाणा घालत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता, टोळक्याने अमित यांना धक्काबुक्की करीत अरेरावी केली. इतर साथीदारांना बोलावून हातात कोयते घेउन दहशत माजविली. त्यानंतर अमित यांच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाणे तपास करीत आहेत.
