भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज चौकात सापळा रचून केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कात्रजमध्ये ट्रॅव्हल्सची वाट पाहत असताना सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
विनोद बालाजी सोमवंशी (वय १९, रा. हनुमाननगर, साई मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, आंबेगाव खुर्द (शनी मंदिर) येथे झालेल्या भांडणातील आरोपी कात्रज चौकात ट्रॅव्हल्सची वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अटक केली.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, धीरज गुप्ता, अंमलदार रविद्र चिप्पा, गणेश भोसले, हर्षल शिदे, अभिजित जाधव अवधुत जमदाडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, नवनाथ खताळ, विक्रम सावत अभिनय चौधरी व तुळशीराम टेंभुर्णे यांनी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
