कोंढवा पोलीसांचा कौशल्यपुर्ण तपास : आठ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दरोडा टाकण्याच्या गुन्ह्यांचा तपास कोंढवा पोलीस स्टेशन पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी कौशल्यपुर्ण तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टाफ यांंनी घटनास्थळ व परीसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मार्फत आरोपीचा शोध घेत असतांना तपास पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असगरअली सैय्यद व पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना काळभोरनगर पिसोळी येथील धनलक्ष्मी सेल्स कर्पोशन इलेक्ट्रीकल्स दुकानाचे शटर उचकटुन चोरीचा प्रयत्न आरोपी अभिजीत गागुर्डे याने केला असून तो पिसोळी गावात पद्मावती मंदिराच्या जवळ ग्रे रंगाची विना नंबर प्लेट ॲक्टिव्हा मोटार सायकलवर त्याच्या साथीदारासह थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपी अभिजीत विष्णु गागुर्डे (वय २४, रा.रामटेकडी, हडपसर पुणे) व त्याचा साथीदार रोहन रवि पंडित (वय २३, रा.वानवडी शांतीनगर, पुणे) यांंना शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याजवळील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी कडनगर येथील पुणेकर शॉपींग कॉम्पलेक्स, गंगा स्पर्श सोसायटीच्या समोरुन ॲक्टिव्हा मोटार सायकलची चोरी करुन साथीदार आसिम मुस्ताक तांबोळी (वय २४, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द), शाहिद मोहम्मद उमर शेख (वय १८, रा.हडपसर) याच्यासह ३ अल्पवयीन आरोपींनी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून २० हजार रूपये रोख रक्कम, २० किलो तांब्याची वायर, एक चोरीची ॲक्टिव्हा मोटर सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली पल्सर व डिओ मोटार सायकल हस्तगत करुन दुकानाचे शटर उचकटुन घरफोडी केल्याचे ०४ गुन्हे, जबरी चोरीचे ०२ व मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे असे एकुण चोरीचे ०८ गुन्हे केल्याचे उघडकीस आणले आहेत. दाखल गुन्ह्यांचा अधिकचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.
सदरची कौशल्यपुर्ण तपासाची कामगिरी ही, पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले व जगन्नाथ जानकर यांच्या निर्देशानुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असगरअली सैय्यद, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, जयदेव भोसले, अभिजीत रत्नपारखी, राहुल रासगे, दिपक जडे यांंनी केली.
