महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मानवाच्या जागृतीची पहिली वारी भगवान बुद्धांनी आशिया खंडात सुरू केली असे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी केले. वैशाख फाऊडेशन आयोजित भगवान बुध्द- महावीर ते संत परंपरा सन्मान सोहळयात ते बोलत होते.
डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात संत साहित्य सम्मान सोहळयात मा. ह.भ. प. डॉ. जयंत करंदीकर यांना व माणुसकीची शाळा चालविणारे प्रसिद्ध लोकशाहीर गायक संभाजी भगत तसेच घुमान साहित्य सम्मेलनाचे आयोजक संतसिंग मोखा यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. अमोल देवळेकर, संगीता शिंदे, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, भंते कुसला बुध्दगया, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत ज्ञानज्योती (चंद्रपूर) हे उपस्थित होते.
भदंत ज्ञानज्योती यांचे या वेळी प्रमुख प्रवचन झाले, पंढरपूरचे विठ्ल मंदिर व वारी विषयी त्यांनी मोलाची माहिती दिली.
2500 वर्षापूर्वी जगात सर्व प्रथम भगवान बुद्धांनी मानव जागृतीसाठी संपूर्ण भारतभर व आशिया खंडात पायी वारी फिरून आपल्या ज्ञानाचा बुद्धत्वचा प्रचार, प्रसार हा मानवाच्या कल्याणकारी जीवनासाठी केला. त्यामुळे भगवान बुध्द, महावीरांपासून ते सर्व संत परंपरांचा सन्मान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. असे त्यांनी सांगीतले,आपल्या सुमंगल वाणीने उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले, यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वैशाख फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन जाणिव फाऊंडेशन, होप फाऊंडेशन, युगी सामाजिक संस्था, सरहद् परिवार, पर्वती प्रतिष्ठान, स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्था, मैत्री ग्रुप, परियत्ती संडे धम्मस्कूल, प्रबुद्ध स्वयंरोजगार संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल बनसोडे, अमोल शिंदे, कमलाकर माने, राजेश गायकवाड, अमोल ननावरे, अमित जगताप, अमोल गायकवाड, धर्मा गरड, प्रमोद जाधव, कवी गोपाळ कांबळे, वैभव वांधरे, प्रभाकर माला, दीपक गायकवाड , विनोद गाडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.
