उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूलचा अभिनव उपक्रम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूल मधील बालवारकऱ्यांनी, टिळेकर नगर येथे अनोखी दिंडी काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .
“गाड्या अन माणसांचा थवा ,
इस्कॉन चौकात सिग्नल हवा “
” सिग्नल नाय ,पूल नाय ,
पोलीस काका करतील काय ?
“लाल पिवळे दिवे नाचवा ,
काका आम्हाला वाचवा .”
अशा आशयाचे फलक घेऊन सुखसागर ते इस्कॉन चौकापर्यंत दिंडी काढली.
या दिंडीचे आयोजन प्राचार्या, क्षमा शेटे ,तेजस्वी जाधव ,आरती माने यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, प्रा. शरदचंद्र काकडे, उपाध्यक्ष, शांभवी ओंकार काकडे उपस्थित होते . आता या चिमुकल्यांच्या गोजिरवाण्या प्रयत्नाची दखल घेऊन वाहतूक विभाग जागा होणार का याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
