महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील व त्यांच्या संस्थेच्या वतीने मागील 2021 यावर्षात अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होत गोरगरिबांना वस्तूरुपाने मदत, रोग्याना उपचार, अंधांना दृष्टीदान, तसेच वारंवार आरोग्य शिबीराचे आयोजन करून “आरोग्यम धनसंपदा” या उक्तीप्रमाणे माणसाचे आरोग्य अबाधीत राखणे ही जबाबदारी समजून यात कार्यरत आहेत.
याच कामाची दखल घेत लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने प्रांतपाल हेमंतजी नाईक यांच्या शुभहस्ते व मल्टिपल कौन्सिलचे चेअर पर्सन अभ्यंकर हिंदी सिनेअभिनेत्री मोनालिसा यांच्या उपस्थितीत बंटरा भवन बाणेर येथे संपन्न झाला. लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजला 2021-22 साठी विठ्ठलराव वरुडे पाटील चार्टर प्रेसिडेंट यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे उत्कृष्ट कार्याबद्दल पाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये, 1) उत्कृष्ट आयकॉन अध्यक्ष 2) उत्कृष्ट आयकॉन सचिव 3) उत्कृष्ट आयकॉन कोषाध्यक्ष 4) कात्रज क्लबने चांगले सेवा कार्य यामध्ये सर्वात उंच उपक्रमात जिल्ह्यामध्ये टॉप टेन मध्ये दुसर्या क्रमांकाचे उत्कृष्ट पुरस्काराचा मान प्राप्त केला.
5) फिरते चषक 2021-22 पहिला पुरस्कार सर्वांगिन सेवा कार्याबद्दलचा मान लायन्स क्लब पुणे कात्रजला मिळाला आहे.
याबद्दल लायन्स क्लबच्या अन्य सहकारी व सामाजिक संस्थाच्यावतीने लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की “जे का रंजले गांजले तेचि म्हणे जो आपुले, देव तेथेचि जाणावा” या उक्तीप्रमाणे आमच्या घराण्यामध्ये सेवा करण्याची आवड व त्यासाठी लायन्स क्लबचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. मला मिळालेल्या संधीचे सोने करत जीव ओतून तन मन धनाने सेवा केली आहे. त्याच सेवेप्रीत्यर्थ कात्रज क्लबला पाच पुरस्कार मिळाले असून यापूर्वी देखील उत्तम कामासाठी सन्मानित केले आहे. या कामाची प्रेरणा देणारे व कामासाठी सन्मानित करणारे सर्वांचे ऋणी असून सर्वांचे आभार मानतो.
