महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : आर के क्लब बार्शी येथे भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा स्नेहल गोविंदा भिसे प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया, धनंजय घोलप सदस्य BCA , सचिन आजबे सदस्य BCA, आनंद शेलार सर हेड -कोच, अनुराधा विकास माने सचिव BCA, हेमा गौतम कांकरिया सहसचिव BCA हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच अथर्व भागवत, विश्वजीत यवनकर, इधांत जैन, तुषार लोंढे मॅन ऑफ द सिरीज इधान्त जैन, बेस्ट बॅट्समन व बेस्ट फिल्डर अवंती घोलप, बेस्ट बॉलर इधांत जैन वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले.
तसेच विजेता संघ कर्णधार यशवर्धन आजबे व उपविजेता हर्ष कांकरिया यांच्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. BCA मधील जे खेळाडू जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झालेले आहेत तसेच काही खेळाडू जिल्हा क्रिकेट संघाच्या प्रॅक्टिस मॅचेस मध्ये निवड झालेले आहेत त्यांचादेखील विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया यांनी खेळाडूंना अतिशय चांगले मार्गदर्शन केले. असोसिएशनचे कोच आनंद शेलार सर यांनी न्यूट्रिशन डायट संदर्भात पालकांना व खेळाडूंना चांगले मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विकास माने यांनी केले.
