महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कार्यक्षम पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांच्या ३९ वर्षाच्या पोलीस सेवेमधील उल्लेखनीय कामगिरीचा सह्याद्रिनंदन गौरव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील विष्णुकृपा हॉल येथे संपन्न झाला.
यावेळी पुणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, फरासखाना विभागाचे पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, विघ्नहर्ता न्यास पुणेचे विश्वस्त भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनिल माने, फरासखाना पो.स्टे.पो.नि. राजेंद्र लांडगे, शब्बीर सय्यद, सेवानिवृत्त ए.सी.पी. नेताजी डांगे, पो. नि. कुंडलिक कायगुडे, यशदा अभ्यासिकेच्या संचालिका संगीता कायगुडे, सह्याद्रिनंदनचे संपादक संजय इंगुळकर, लोकसेवा अकादमीचे आप्पा हातनुरे, मुंबई पोलीस दलातील पी.एस.आय. संदिप साळवे, आय.सी.आय.सी. आय. बँकेच्या वरिष्ठ अधिकारी प्राजक्ता साळवे, बांधकाम व्यवसायिक शिरीष आपटे, डॉ. अमोल जोग, आर्टिस्ट प्रशांत बापट, प्रणिता बापट, ओमकार कायगुडे, प्रसन्ना कायगुडे, सेवानिवृत्त पी.एस.आय. गोविंदभाऊ कोतवाल, अरविंद पाटील, संभाजी म्हेत्रे, नंदकुमार सुर्यवंशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सह्याद्रिनंदन गौरव अंकाचे प्रकाशन राजेंद्र डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस बोलताना ते म्हणाले की कुंडलीक कायगुडे यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यानंतर ते पोलीस निरीक्षक म्हणून ३९ वर्षे निष्कलंक सेवा बजावली. त्यांनी पुणे-मुंबई येथे वाहतुक विभागात कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच संतोष माने नावाच्या एस.टी. चालकाने नऊ लोकांचे बळी घेऊन तीस-चाळीस लोकांना जखमी केले होते. त्या संतोष मानेला त्यांनी जेरबंद केले. तसेच अनेक गुन्ह्याच्या तपासात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर डॉ. मिलिंद भोई यांनीही कायगुडे यांच्या संपुर्ण ३९ वर्षाच्या कारकिर्दीतील महत्वाच्या गोष्टीची माहिती दिली. तसेच यावेळी सह्याद्रिनंदनचे संपादक संजय इंगुळकर, प्राजक्ता साळवे, संदिप साळवे, राजेंद्र लांडगे, सुनिल माने, आप्पा हातनुरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष जराड यांनी केले तर आभार सह्याद्रिनंदनचे कार्यकारी संपादक शिवतेज इंगुळकर यांनी मानले.
यावेळी मोल्डन मेमरीजच्या माध्यमातून स्वरगंध या मराठी-हिंदी गाण्याच्या मनोरंजनाचा सुश्राव्य कार्यक्रम पार पडला.
