महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कात्रज : सुखसागरनगर भागात शांतता, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी या पोलीस चौकीचा नागरिकांना फायदा होईल. या चौकीमुळे पोलीस व नागरिक यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते आणखी दृढ होईल असे मत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक प्रकाश कदम यांच्या विकास निधीतून सुखसागरनगर परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सुखसागर नगर पोलीस चौकीचा लोकार्पण सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडला. सुखसागरनगर पोलीस चौकीमध्ये प्रत्यक्षात कामकाजाला देखील सुरुवात झाली आहे. यावेळी पुण्याचे पोलीस उपायुक्त सागर पाटील, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सुखसागरनगर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक स्वराज पाटील यांची उपस्थिती होती.
तसेच, प्रकाश कदम, स्वीकृत नगरसेवक संतोष धुमाळ, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम, सामाजिक कार्यकर्ते अनुराधा डावखर, स्नेहल जाधव, किर्ती भंडगे, निरंजन घाटे, महादेव चोरघे, श्रीकांत जाधव, जितू चव्हाण, बाळासाहेब गोगावले, हनिफ शेख, हुसेन सय्यद, संजय खोपडे, नारायण निंबाळकर तसेच परिसरातील नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
