जाणीव फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे “वास इस दास” हे नाटक जाणीव फाऊंडेशन तसेच स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्थेने नुकताच पुण्यात आयोजित केले होते. मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या या नाटकास उपस्थित रसिकांनी मनापासून दाद दिली.
कुमार जाधव, अंकिता शिवतरे, आकाश तावरे, युवराज बंड, कामेश लांडे, रचना निफाडकर, अविनाश धुळेकर यांनी या नाटकांत प्रमुख भूमिका केली आहे. या लोकप्रिय नाटकास उत्कृष्ट नाटक – द्वितीय क्रमांक, स्त्री अभिनयाचे रौप्य पदक, रंगभूषा व वेशभुषेचे पारितोषिक तसेच दिग्दर्शनाबद्दल विशेष पारितोषिक अशी मानाची चार पारितोषिके मिळाली आहेत.
याच कार्यक्रमात संगीतकार अशोक लांडगे यांच्या “प्रितीच्या सरी “या अल्बमचे प्रकाशन नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या
हस्ते झाले.
याप्रसंगी इतिहास अभ्यासक महेश बुलाख, निर्माता आयुष किरण ओसवाल, बालाजी ऑन क्रिएशन्सचे अध्यक्ष कल्पेश जडिया, दिग्दर्शक ज्ञानेश्वर भिलारे, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र फरांदे, समाजसेवक संजय कडू, संतोष पासलकर, संदीप काळे, किरण साबळे, लेखक चरण वणवे, गायक के. राणू, पार्वती महिला बचत गटाच्या प्रतिभा कांबळे, नम्रता हंबीर आदी मान्यवर उपस्थित होते.
जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे व स्वरगंधारचे संस्थापक कवी गोपाळ कांबळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे संयोजन वैभव वांढरे, ओंकार कांबळे, गणेश हंबीर, शेखर चिकणे, विकी शिंदे यांनी केले.
