महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश मधून बिगर बासमती तांदुळाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. गुजरातमधुन वाडा कोलम व पोहा मोठ्या प्रमाणात येतो.
यंदा नवीन हंगामामध्ये बासमती आख्खा व तुकड्याचे भाव खूप उंच निघाले. बासमतीची निर्यात वाढल्याने व देशांतर्गत ही खप वाढल्याने भाव उंच आहे. सर्वसामान्यांच्या पसंतीचा बासमती तुकडा महाग झाल्याने
ग्राहक सोनामसूरी व कोलमकडे आकर्षित झाले.
त्यामुळे मसूरी, सोनामसूरी, कोलम, वाडाकोलम, सुगंधी चिन्नोर, इंद्रायणी या जातीचे तांदुळाची विक्री अधिक प्रमाणात झाली. सध्या सर्व ठिकाणी धान्यामध्ये तुटवडा झाल्याने बिगर बासमती तांदुळामध्ये ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. सध्या लग्नसराई संपल्याने व शाळा सुरु होणार असल्याने सध्या बाजारात ग्राहकांचे प्रमाण कमी आहे. तांदुळामध्ये मागणी वाढल्यास अजून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल भाव वाढण्याची शक्यता आहे, असे जाणकारांचे मत आहे. बिगर बासमती वाढल्याने ग्राहक पुन्हा बासमती तुकड्याकडे वळण्याची शक्यता आहे, असे मत तांदुळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी सांगीतले.
