महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : लिओ क्लब बार्शी टाऊन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे २०२३-२४ च्या अध्यक्षपदी युवा उद्योजक आदित्य सोनिग्रा, सचिव पदी यश कुंकूलोळ तसेच खजिनदारपदी मीत परमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
क्लबचे सल्लागार लायन ॲड वासुदेव ढगे लिओचे प्रांत अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ नुतन प्रांत चेअरपर्सन लायन अतुल सोनिग्रा, लायन्स क्लब बार्शी टाऊन ट्रस्ट चे अध्यक्ष भरतभाई परमार, रवी बजाज, प्रकाश फुरडे, विनोद बुडुक, आनंद पुनमिया, डॉ योगेश कुलकर्णी, अमीत कटारिया व सर्व सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लिओ क्लब बार्शी टाऊन कडून बार्शी तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी अल्पदरात दर मंगळवारी मधुमेह तपासणी कोठारी लॅब येथे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर हे उपक्रम गरजू रुग्णांसाठी साठी उपयुक्त ठरत आहेत. तसेच चाईल्डहुड कॅन्सर, दंत चेकअप शिबीर, पर्यावरण स्वच्छता अभियान, अन्नदान, शाळेतील विद्यार्थीनींसाठी सशक्तीकरण व्याख्याने यावर काम करत आहेत.
