अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगीरी : परराज्यातील तीघांना केले जेरबंद
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : अंमली पदार्थांचा बेकायदेशीर साठा करून त्याची विक्रि होत असलेल्या वडाची वाडी येथील एका सोसायटीतील सदनिकेत छापा टाकून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ पथकाने परराज्यातील तीघांकडून सव्वा तीन लाख किंमतीचे गाजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले.
परराज्यातून येवून पुणे येथे बेकायदा अंमलीपदार्थांची विक्री करणार्या नासिर शेख (रा. अमित अस्टोनिया, क्लासिक सोसायटी, वडाची वाडी रोड, ऊंड्री, पुणे ) व त्याचे साथीदार पुनीत कदयान व शरत नायर दोघे (रा.व्यंकटेश भुमी, ब्लिस सोसायटी बिल्डींग नंबर ए फ्लॅट नंबर १००६ सर्व्हे नंबर ५ पुणे) यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई योगेश मोहिते यांना त्यांच्या बातमीदाराकडून या बेकायदा अंमली पदार्थी विक्री करणार्यांची माहिती मिळाली होती. नाशीर शेख, पुनीत कदयान व शरत नायर हे तीघे परराज्यातून येवून वडाची वाडी येथील सोसायटीत राहून
चरस, गांजा व इतर अंमली पदार्थ बाळगून विक्री करत होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. नासिर नुरअहमद शेख ( वय ३० रा. अमित अस्टोनिया क्लासिक सोसायटी, वडाची वाडी रोड विंग ए-१ फ्लॅट नंबर २०४ उंड्री पुणे, मुळचा रा. मडगांव गोवा) पुनित सतबीर कादयान (वय ३५ वर्षे, रा. ब्लीस सोसायटी, मूळचा रा. हरियाना) शरत विजयन नायर, (वय-३४ वर्षे, रा. मुळचा रा. चेन्नई ) यांना ताब्यात घेतले. ते रहात असलेल्या घरात १ किलो ६०० ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम १०० मिली ग्रॅम हशिश तेल, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा किंमत रूपये ४९००० चे अंमली पदार्थ, १०३ किलो ५०० ग्रॅम वजन असलेला सुमारे सत्तर हजार रूपये किमतीचा गांजा, ०८ ग्रॅम ३३० मिलीग्रॅम चरस मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा अशी एकूण स्वतःला तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात. आहे. त्यांचे विरुध्द कोंढवा पोलिस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण देंगळे हे करीत आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, यांच्या मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि. लक्ष्मण देंगळे व पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी,पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितीन जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
