मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात कार्यवाही : चार ट्रक व एका टेंपोचा समावेश
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली वाहने अनेक वर्षे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यातील चार ट्रक व एका टेंपोचा लिलाव करण्यासंबंधीची सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे हा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती मार्केट यार्ड पोलिसांनी दिली आहे. इच्छुकांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनसी संपर्क साधवा. फोन नं.०२०-२६२७५१३७
