भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी : सोन्याच्या दोन अंगठ्यांसह सव्वालाख रूपये हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज :
पुणे : कात्रज येथील संतोष नगर परिसरात घरफोडी करून रोख रक्कमेसह सोन्याच्या अंगठ्या चोरून पसार झालेल्या विधीसंघर्षीत बालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ४८ तासात अटक केली. त्याच्याकडील मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत केली.
पंधरा ऑगस्ट रोजी दुपारनंतर अन्वर सत्तार मोमीन (वय ४६, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) यांच्या रहात्या घराचा कुलुपबंद दरवाजा तोडून चोरी झाली होती. चोरटयाने बंद दरवाजाचा कडी कोयंडा उचकटुन घरात प्रवेश केला होता. कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठया व रोख १,६६,००० रूपये घेवून चोरटा पसार झाला होता. त्याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना पोलीस अंमलदार राहूल तांबे व धनाजी धोत्रे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानुसार शेजारीच राहणार्या एका बालकावर संशय व्यक्त झाला होता. कात्रज भाजी मंडई परिसरात फिरत असलेल्या आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याच्याकडे ३० हजार रुपये सापडले. सखोल चौकशीत घरफोडी करछन चोरी केल्याचे आरोपीने कबुल केले. अधिक तपास केला असता त्याने चोरलेली उर्वरीत रक्कम १,३४,००० व सोन्याच्या दोन अंगठया हस्तगत करण्यात आले. सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे शहर परिमंडळ दोन चे पोलीस उप आयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उप निरीक्षक अंकुश कर्चे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, योगेश सुळ, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, नवनाथ खताळ यांनी केली आहे.
