विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौघांपैकी दोन जण अटकेत
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : नगररोड परिसरात बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपचा पाठलाग करून विमानतळ पोलिसांनी तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी चौघांपैकी दोघांना अटक केली असून,
आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
सोमवारी (16 ऑगस्ट) रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ पोलिसांच्या तपासपथकातील पोलिस नाईक सुशील जाधव आणि त्यांचे सहकारी अंमलदारांसह मध्यरात्री गस्तीवर असताना एक गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप नगर रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
तपासपथकाचे प्रभारी सचिन जाधव व पोलीस स्टाप यांनी सापळा रचून गुटखा वाहतूक करणारा बोलेरो पिकअप पुणे-नगर रोड वरून भरधाव वेगाने जात असताना त्याचा पाठलाग करून खडकी येथील मुळा रोड परिसरात पकडून दोघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून त्यांच्याकडील २०,००,६०० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा (गुटखा) व महिंद्रा बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली. उर्वरीत दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई ही, पुणे शहर पूर्व प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशाने विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव आणि गणेश साळुंखे, अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश घेडे, रमेश लोहकरे, विनोद महाजन, नाना कर्चे, हरुण पठाण, विनोद भोसले, शिवराज चव्हाण, सुशील जाधव, अंकुश जोगदंडे यांनी केली आहे.
