विमानतळ पोलिसांची कामगिरी : साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावर आठवड्यापूर्वी मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील १६,००० रुपये चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
लोहगाव येथील धानोरी रोड परिसरातील साठे पेट्रोल पंपावर आठवड्यापूर्वी लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावर अॅक्टीव्हा स्कूटरवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा केला. ४०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर कर्मचाऱ्याने पैसे मागितले असता कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील १६,००० रूपये हिसकावून चोरटे पसार झाले होते.
विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार तपास पथकाने सी.सी.टि.व्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अनिकेत ऊर्फ दत्तात्रय बबन जाधव (वय १९, रा. ढोरगल्ली, गणेशपेठ, पुणे) आणि रोहन जयदीप चव्हाण (वय १९, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांच्यापर्यंत पोहचले. पुणे गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेल्या रोख रकमेपैकी १०,९०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याच्या वेळी वापरलेला लोखंडी कोयता व स्कूटर आणि रोख रक्कम असे एकूण ६०,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपींनी असे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, पुणे शहर पूर्व प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झंझाड यांचे तपासपथक आणि खंडणी विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, गणेश साळुंखे, अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विनोद महाजन, नाना कर्चे, हरुण पठाण, विनोद भोसले, शिवराज चव्हाण, सुशील जाधव, अंकुश जोगदंडे यांनी केली.