महाराष्ट्र ३६० न्यूज
हडपसर (शेवाळवाडी) परिसरातील बंगल्यातून चोरट्यांनी 155 तोळे दागिने, परकीय चलन, चांदीच्या वस्तू, रोकड असा 88 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकऱणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये विवेक चोरघडे (वय 47, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, चोरघडे यांचा शेवाळवाडीमध्ये बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात मागील बाजूने मध्यरात्री चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून 155 तोळे सोन्याचे दागिने, परकीय चलन, चाळीस हजारांची रोकड, चांदीच्या वस्तू असा 88 लाख 38 हजारांचा ऐवज लांबविला. हडपसर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पाहणी जाऊन पाहणी केली. चोरघडे यांच्या बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे तपास करत आहेत.
