पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
किरकटवाडी, खडकवासला परिसरात राञी व पहाटेच्यावेळी चोरट्याची टोळी फिरत आहेत पोलीस गस्ती पथकांना चुकवून चोरांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. चोरांवर नजर ठेवण्यासाठी रात्रीची गस्ती वाढवणार असल्याचे हवेली पोलीसांनी सांगितले.
खडकवासला गावामध्ये बुधवार (दि.६) पहाटेच्या सुमारास अज्ञात भुरट्या चोरट्यांनी सुरज ढमढेरे यांचे कार्यालय फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्ञ हातात घेऊन कार्यालयाचे शटर फोडून प्रवेश करताना सीसी टीव्हीमध्ये कैद झाले आहे. तर अतुल मते यांच्या स्वागत हॉटेलचे रात्री तीनच्या सुमारास चोरटे शटर तोडून प्रवेश करताना सीसी टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत. हॉटेलमधील एक हजार रुपये चोरी गेल्याचे मते यांनी सांगितले.
सदर घटनेमुळे खडकवासला सिंहगडरोड परिसरातील नागरिक व व्यवसायिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मी सकाळी कार्यालयात आल्यानंतर मला हा सगळा प्रकार निदर्शनास आला .शटर उचकटुन आतील सर्व सामान तोडून अस्ताव्यस्त केले होते.माझ्या कार्यालयाचे दीड लाखाचे नुसकार झाले आहे. – सुरज ढमढेरे, खडकवासला
खडकवासला पंचक्रोशीतील परिसर भुरट्या चोरांनी काल रात्री चोरी केल्याचे तक्रार आ आल्या आहेत. चोरीची किंमत किरकोळ असली तरी भविष्यात मोठ्या घटना घडू नयेत यासाठी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रात्री गस्तीत वाढ करण्यात आली आहे. – सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.