वारजे पोलीस स्टेशन : समर्थ रेसीडन्सी शिवणे येथील घटना
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
मानलेल्या बहिणीकडे घराची चावी ठेऊन जाणार्या भावाच्या घरात दाजीनेच घरफोडी केल्याचा प्रकार वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की,तुषार बनकर (रा. समर्थ रेसिडन्सी, शिवणे) हे गावाला जाताना आपल्या घराची चावी आपली मानलेली बहीण यांच्या घरी देऊन जात. या मानलेल्या बहीणेचे पती चेतन गरुड (वय 21) यांनी बनकर यांच्या घराच्या चावीची डुप्लीकेट चावी तयार करून घेतली. तुषार बनकर हे बाहेर गावी गेल्याचे कळताच त्यांनी त्यांच्या घरात घरफोडी करून सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचा माल लंपास केला.
बनकर यांनी वारजे पोलिसात या विषयी तक्रार दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी तपास करीत आरोपी शोधून काढला.सुरुवातीला चोरीचा नकार देणारा आरोपी पोलिसी खाक्या दिसताच त्याने चोरीची कबुली दिली. चेतन गरुड याला पोलिसांनी अटक केली आहे.

 
			


















