बार्शी : पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज
बार्शी : बार्शी किराणा व भुसार व्यापारी संघ बार्शी या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक यश लॉन्स येथे पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश शेलार, सचिव निनाद होनराव, सिंकदर शेख, संजय श्री श्रीमाळ, गणेश भडुळे, आप्पा गुडे, आशय आवटे, संजय अंबड, आनंद सुराणा, भरत परमार, प्रीतम बलदोटा आणि सदस्य उपस्थित होते.
संघाचे माजी अध्यक्ष विलास गुगळे यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त होते. नूतन अध्यक्ष बाफणा हे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे विद्यमान सदस्य, भारतीय जैन संघाचे प्रांतिक सदस्य, महावीर जैन सेवा संघाचे उपाध्यक्ष, तसेच माजी नगरसेवक आहेत. निवडीनंतर बोलताना बाफणा म्हणाले की, ‘‘लवकरच बार्शी किराणा संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.’’ त्यांनी किराणा व्यापारी बांधवांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
