महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्कातील आरोपी रविंद्र बर्हाटे यास पोलिसांपासून लपविण्यासाठी मदत करणारा वकील सागर म्हस्के यास अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. यापूर्वीच टोळीप्रमुख रविंद्र बर्हाटे हा स्वत:हून पोलिसांकडे हजर झाला आहे.
रविंद्र बर्हाटे व त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविंद्र बर्हाटे यास लपण्यासाठी वकील सागर म्हस्के याने वेळोवेळी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. आणखी कोणी मदत केली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखा-1 सहा.पो.आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर बर्हाटे याला वेळोवेळी मदत करणारी काही नावे पोलिसांना मिळाली असून त्यांचा तपास शोध सुरु आहे.














