दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : दुकानातून चाळीस हजारांचा माल लंपास
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
लोणीकंद हद्दीमध्ये दिशा किराणा मालाच्या दुकानातील सुमारे चाळीस हजारांचा माल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट सहाकडून पेरणेफाटा परिसरात अटक करण्यात येऊन लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्हयामध्ये एकूण ३९,८१८ रुपये किमतीचा किराणा माल चोरीस होता. नमूद गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट सहामार्फत समांतर तपास सुरू असताना पोलीस शिपाई ताकवणे आणि व्यवहारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणीकंद हद्दीमध्ये दिशा किराणा मालाचे दुकान फोडलेले आरोपी हे पेरणेगाव ते डोंगरगाव रोड या परीसरात येणार असल्याचे सांगितले. अशी खात्रीशीर माहिती मिळताच सदरची माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी पेरणेफाटा परिसरात जाऊन सापळा लावून शोध घेत असताना मिळालेल्या बातमीतील वर्णनाचे इसम हे संशयितरीत्या डोंगरगावकडे जाणाऱ्या रोडवर उभे असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट सहाच्या कार्यालयात आणले.
राजपाल कांतीलाल शेरावत (वय १८, रा. डेगरजवाडी, कोरेगाव भीमा, ता. शिरुर जि. पुणे मूळगाव- मु. पो. दिरावत ता. प्रतापगड जि. पाली रा. राजस्थान) आणि नरेंद्र जितेंद्र भिरावत (वय १९, रा. साठेवस्ती सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळगाव- जाधववाडी, चिखली, पिंपरी-चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता, त्यांनी लोणीकंद गावामध्ये चार दिवसांपूर्वी किरणा मालाचे दुकान दोघांनी मिळून फोडल्याचे कबूल केले. त्यांना पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंब, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
