एकाच वेळी १२ ठिकाणी छापे : विमानतळ,कोंढवा व हडपसर हद्दीत छापे
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पोलीस आयुक्त अमीताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत, शहरात पोलीस राज निर्माण करण्याकडे कल दीला आहे. आयुक्तांनी पुण्यातील अनेक गुंडावर मोक्का लाऊन याबाबत गुंडांना स्पष्ट संकेतच दिले आहेत. आता यासोबतच त्यांनी आपला मोर्चा अवैध्य धंदे करून गुन्हेगारी विश्वास बळकटी देणाऱ्याकडे वळवला आहे.
काल २७ ऑगस्ट रोजी एका विशेष मोहिमे अंतर्गत पुणे शहरातील अवैधरित्या दारु विक्रेत्यांवर गुन्हे शाखा व पुणे शहर पोलीसांनी एकत्रित कारवाई केली . पुणे शहरामध्ये अवैध रित्या दारु व अंमली पदार्थांची विक्री होत आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमीताभ गुप्ता यांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीनुसार दारु विक्री करणा-या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी व २ पोलीस निरीक्षक, २४ पोलीस उप निरीक्षक, पोलीस मुख्यालय तसेच गुन्हे शाखोकडील ३२ पोलीस अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच वेळी विमानतळ, कोंढवा व हडपसर पोलीस ठाणे हद्दीत छापे मारण्यात आले.
अवैधरित्या दारु विक्री, हुक्का पार्लर व अंमली पदार्थ विक्री करणा-या एकुण १२ ठिकाणांवर छापे मारुन संबंधीत पोलीस स्टेशनला ११ गुन्हे नोंद करुन एकुण २,०७,५७३/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यामध्ये एकुण १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे
सदरची कारवाई पुणे शहरपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रिनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाई मुळे अवैध्य धंदे करणार्याचे धाबे दणाणले आहेत.















