तहसीलदार यांनी दिली फिर्याद
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 439 फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव (वय 47, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, भालेराव हे तहसीलदार ताबा या पदावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शिंदे वस्ती येथे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती बांधल्या आहेत. या इमारती कुलूप लावून बंद असताना इमारत ए विंगमधील 215 सदनिका व बी विंगमधील 224 सदनिका अशा एकूण 439 सदनिकाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी नळ, मिक्सर व शॉवर असे तब्बल 1 लाख 9 हजार 750 रुपयांचा माल चोरुन नेला. चोरीचा हा प्रकार 4 जून ते 26 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.

 
			


















