वडगावशेरीमध्ये पैशाच्या वादातून घटना : चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
घटस्फोटीत पती-पत्नीमध्ये पैशावरून वाद सुरू होता. पैसे देतो, असे सांगून घराबाहेर बोलावून पत्नीवर पतीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वळप्पा निवास, साईनाथनगर, गवळीवाडा, वडगावशेरी येथे शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
सनी बाळू गायकवाड (वय ३२, रा. मांजरी, केशवनगर, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वडगावशेरी येथील तीसवर्षीय महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
सनी गायकवाड याच्याशी २०११ मध्ये जखमी महिलेचा धार्मिक रितिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. मात्र, २०१७ पासून काही कारणास्तव ते विभक्त राहत होते. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
दरम्यान, फिर्यादीने आरोपीस वेळोवेळी पैसे दिले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. आरोपी फिर्यादीला फोन करून घरी येतो, तुझे काय असतील ते पैसे देऊन टाकतो, असे सांगून बाहेर बोलावले. त्यावेळी फिर्यादीने चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक विवेक रिसाळ पुढील तपास करीत आहेत.
