सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाची धडाकेबाज संयुक्त कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाने धडाकेबाज संयुक्त कामगिरी करून मौजे आष्टी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये किमतीचा संशयित खते-कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे.
एल.सी.बी सोलापूर ग्रामीणकडील सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांचे पथक असे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नाल्याविषयी गुन्ह्यांची उकल करण्याकामी मौजे शेटफळ (ता. मोहोळ) येथे असताना, सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, मौजे आष्टी (ता. मोहोळ) येथील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये राहणारा एक इसम हा त्याच्या घरालगत असलेल्या पत्राशेडमध्ये संशयित खते कीटकनाशकाचा साठा बाळगून आहे. याबाबत मांजरे यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असता त्यांना योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची मदत घेऊन तेथील जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी सागर बारवकर, गजानन मारडकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती मोहोळ प्रभारी कृषी अधिकारी, पंचायत समिती मोहोळ, संपत कंठाळे, मंडळ कृषी अधिकारी मोहोळ, तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार असे सर्व जण संयुक्तरित्या कारवाई करणेकरिता मौजे आष्टी (ता. मोहोळ) येथील अण्णा भाऊ साठे नगरमधील एका किराणा दुकानाच्या पाठीमागील पत्राशेडजवळ आले असता तेथे एक इसन उभा असलेला दिसला.
त्याचा बातमीच्या अनुषंगाने संशय आल्याने तेथे जाऊन त्याच्या घरालगत असलेल्या पत्राशेडमध्ये जाऊन पाहिले असता, पत्राशेडमध्ये संशयितरीत्या खते कीटकनाशकाचा साठा मिळून आला, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या इसमास कृषी अधिकारी गजानन नारकडकर यांनी पत्राशेडच्या गोडावून मध्ये मिळून आलेल्या कीटकनाशकांचा व औषधांचा साठा, नोंदणी प्रमाणपत्र, उत्पादन विक्री प्रमाणपत्र यांची मागणी केली असता, ते नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा सदर ठिकाणचा कीटकनाशकांचा साठा व जागा याबाबत सखोल चौकशी केली.
सदर ठिकाणी पत्राशेडमध्ये विनापरवाना उत्पादन व विक्री असलेल्या कीटकनाशकाचा साठा मिळून आला त्याचे वर्णन पुढील प्रमाणे Emamectin Benzoate 5% SG Insecticide, Aden Crop Care Co कंपनीच्या उत्पादक Anand Agro Care कंपनी असून विक्रेता Green India Agrotech Tal Haveli Dist Pune या कंपनीचा GREEN KMB (Potassium Mobilizing Biofirtilizer), Green Exide, M Gold, Fungies, Top Neem GREEN ZYME असा एकूण ३ लाख ८३ हजार ८८५ रु. किमतीचा संशयास्पद कीटकनाशकाचा साठा मिळून आल्याने तो गजानन मारडकर यांनी जप्त करून पत्राशेडमध्ये राहिलेल्या संशयिताची कीटकनाशक मालाबाबत विक्रीबंद आदेश देऊन तो गोडावून मध्येच ठेवून गोडावूनला लेखी सिल करण्यात आले आहे.
सदर बाबत विस्तार अधिकारी पंचायत समिती मोहोळ-प्रभारी कृषी अधिकारी, पंचायत समिती मोहोळ गजानन मारडकर यांनी संशयित इसमाविरुध्द फिर्याद दिल्याने मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस सब इनस्पॅक्टर खापरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा धीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख, तसेच कृषी विभागाचे सागर नवनाथ बारवकर, गजानन मधुकर मारडकर, संपत अण्णा कंठाळे आणि कृषी सहायक प्रवीण हंगरगी यांनी बजावली आहे.
