खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
अर्जदार योगेश नागनाथ शिंदे हे सम्यक इन्डेन गॅस एजन्सी, शांतीनगर, येरवडा पुणे येथे मॅनेजर असून त्यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून मोईन चौधरी व वसिम शेख हे जाऊन गॅस सिलिंडर नेण्यास आलेल्या ग्राहकांची व्हिडिओ शुटिंग व फोटो काढून अर्जदार यांना तुम्ही गॅस डिलेव्हरी घरपोच देत नाहीत, तुमची गॅस एजन्सी बंद करणे या आशयाचा इंडियन ऑईल कंपनीला तक्रार करून सदर तक्रार मागे घ्यायची असल्यास तुला आम्हाला दोन लाख रुपये रोख व प्रत्येक महिन्याला प्रत्येकी पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी खंडणीची मागणी सम्यक संपादक पत्रकार संघ, महाराष्ट्र याचे अध्यक्ष सुहास मारुती बनसोडे, मोईन लाडलेसाहेब चौधरी व वसिम अकबर शेख यांनी केल्याबाबतचा तक्रारी अर्ज खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा येथे प्राप्त झाला होता. सदर तक्रारी अर्जावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झालेले होते.
दि.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अर्जदार यांना जी.एस. टॉवर मार्केटयार्ड, ९ नंबर गेटचे समोर पुणे येथे बोलाविले असल्याबाबतची अर्जदार यांनी खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे येथे माहीती दिली असता खंडणी विरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी स्टाफला तात्काळ तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई करुन अर्जदार यांच्याकडून दोन लाख रुपये स्वीकारताना सम्यक संपादक पत्रकार संघ, महाराष्ट्र याचे अध्यक्ष व समीक्षा टाईम्सचे संपादक सुहास मारुती बनसोडे, मोईन लाडलेसाहेब चौधरी व वसिम अकबर शेख यांना रंगेहाथ पकडून मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत औचरे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, प्रवीण पडवळ, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, महिला पोलीस आशा कोळेकर, रूपाली कर्णवर यांनी केलेली आहे.
