इंटरनेट व संगणकाद्वारे कोट्यवधींची फसवणूक : कंपनीच्या लॉगिन आय.डी.चा केला गैरवापर
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कंपनीच्या लॉगिन आय. डी.चा गैरवापर करून इंटरनेट व संगणकाद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे शहरातील डब्ल्यू. एन. एस. कंपनीमध्ये सन २०१८ ते २०२० च्या दरम्यान आदीत्य लोंढे (रा. शिवाजीनगर पुणे) आणि इतर साथीदारांनी त्यांच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन व कंपनीच्या लॉगिन आय. डी. चा गैरवापर करून इंटरनेट व संगणकाद्वारे डब्ल्यू.एन.एस. कंपनीमध्ये ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याने आदीत्य राजेश लोंढे (वय २८, रा. शिवाजीनगर, पुणे) आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावर दिनांक २६ जून रोजी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा आरोपी फरार होता.
दि. २७ ऑगस्ट रोजी खंडणीविरोधी पथकाकडील अधिकारी आणि अमंलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस नाईक रमेश चौधर व पोलास शिपाई पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराने बातमी दिली की, डब्ल्यू. एन. एस. कंपनीमध्ये फसवणूक करुन पळून गेलेला आरोपी आदित्य लोंढे हा जे.एम. कॉर्नर, जंगली महाराज रोड, पुणे येथे येणार आहे. प्राप्त बातमीची खातरजमा करून सदर परिसरात साफळा रचून सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला करता, त्याने सदरचा गुन्हा कबुल केल्याने सदर आरोपीस पुढील योग्य त्या कारवाईकरिता सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहपोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, पोलीस हवालदार मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपुत, अतुल साठे, संजय भापकर, पोलीस नाईक नितीन कांबळे, रमेश चौधर, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, विजय कांबळे, पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, हनुमंत कांदे यांनी केली आहे.
