समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क
भाडेतत्त्वावर 3 इलेक्ट्रिक बाईक घेऊन, त्या परत न करता विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आला. त्याचवेळी या बाईकच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
अरीश रेमंड धवर (रा. लक्ष्मी रेसिडेंसी, पठारे वस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल रमेश गानिगा (वय 30, रा. शिवरंजन टॉवर्स, सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, राहुल यांच्याकडून आरोपीने 16 ऑगस्ट रोजी 3 इलेक्ट्रिक बाईक भाडे तत्वावर घेतल्या आहेत. त्या वेळेत परत केल्या नाहीत. त्यांनी त्या परत मागितल्यानंतरही न दिल्याने विश्वासघात करुन फसवणूक केल्याची तक्रार राहुल गानिगा यांनी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जोरे तपास करीत आहेत.
