पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
ठेकेदार आणि कामगाराची कामावरुन आणि कामाच्या पेमेंटवरून वादावादी झाली. त्या रागातून ठेकेदाराने कामगाराला पहिल्या मजल्यावरुन फेकून दिले. ही घटना वडगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
संजय मुरलीधर तुंबर (46) आणि रामचंद्र किसन वाघचौरे (36, रा. वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मंतसीर हासीफ आलम (21) याचा सहकारी जुनेद याला आरोपी बांधकम साईटवर कामावरुन व पेमेंटवरुन मारहाण करीत होते. यावेळी फिर्यादी आलम हा तुम्ही कामाबाबत आमच्या ठेकेदाराशी बोला असे बोलला. या रागातून आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जबरदस्तीने जिन्याने ओढत पहिल्या मजल्यावर नेले.
तेथे पुन्हा बेदम मारहाण केली. यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. संबंधित इमारतीच्या कामाचा ठेका आरोपींनी घेतला आहे. तर फिर्यादी दुसऱ्या एका ठेकेदारामार्फत तेथे काम करतो. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खेडकर करत आहेत.
