पती अटकेत : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव पठार (सिंहगड व्हिला) येथे २९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीला भारती विद्यापीठ स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे.
गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३, सध्या रा. सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार, पुणे, मूळ रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश पिसे (वय ५५, रा. बीड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची मुलगी प्रतिक्षा हिचा विवाह गहिनीनाथ सरवदे यांच्याबरोबर झाला आहे. तिला घरगुती कारणावरून पतीने शिवीगाळ व हाताने मारहाण करून मानसिक त्रास दिला. त्यामुळे प्रतिक्षाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धामणे करीत आहेत.
