चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल ताब्यात : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मोबाईल हिसकावून चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद करण्यात आले आहे. चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल करून एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. ०२सप्टेंबर) गुन्हे शाखा पुणे शहरकडील स्टाफ युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना युनिटकडील पोलीस अंमलदार विनोद शिवले व अकबर शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्प्लेंडर मोटार सायकलवरून पुणे शहरात मोबाईल चोऱ्या करून ते चोरी केलेले मोबाईल विक्री करण्याकरीता ए. एम. कॉलेजजवळ, महादेवनगर येथे येणार आहे आणि दिनांक शुक्रवारी युनिटकडील पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे व चेतन चव्हाण यांना बातमी मिळाली की, विनोद वर्मा याने कोंढवा येथील कॅफे लायलीना येथील काऊन्टरवरुन मोबाईल चोरी केली असून ते विक्री करण्याकरीता खडीमशिन चौकात येणार आहे.
सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सांगून त्यांच्या मार्गदशर्नाखाली युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहरच्या स्टाफने मोबाईल चोरी करणाऱ्या रमेश नागेश माने (वय १९, रा. विद्याविहार कॉलनी, माळवाडी, हडपसर, पुणे, मूळगाव मु.पो. आळंब, गुलबर्गा, राज्य कर्नाटक) आणि विनोदकुमार केसकुमार वर्मा (वय २१, रा. हॉटेल लायलीना, कौसरबाग, कोंढवा, पुणे, मूळगाव धनुबा, पो. इथवा, ता. रामनगर, जि. चित्रपुर, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी मोबाईल चोऱ्या केल्या असल्याचे कबुली दिली. त्यांचेकडून एकूण १,१५,५००रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये मोटार सायकल व ८ मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहे. तसेच त्यांचेकडून जप्त मुद्देमालावरून एकूण चार मोबाईल गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हण, विनोद शिवले, अकबर शेख, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, प्रवीण काळभोर, पृथ्वीराज पांडोळे, अजय गायकवाड, संजयकुमार दळवी, दीपक लांडगे, दाऊद सय्यद, विशाल भिलारे, अमर उगले, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केली आहे.















