खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कात्रज-वाकडेवाडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधला डाव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पीएमपी बसमध्ये कात्रज-वाकडेवाडी प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये तीन लाख हजार रुपयांचे दागिने होते.
याप्रकरणी औरंगाबादमधील ५२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कात्रज-वाकडेवाडी पीएमपीने (बस क्र.४२)ने रविवारी (दि. १२ सप्टेंबर) प्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची दागिने ठेवलेली पर्स चोरून नेली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ करीत आहेत.















