वारजे-रामनगरमधील घटना : अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगर येथे उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते दोघे वारजे रामनगर परिसरातील रहिवाशी आहेत. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शंकर इंगळे (वय २२ रामनगर), सलील इस्माईल कोकरे (वय २४, वारजे गावठाण) अशी अपघतात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वारजे येथून दुचाकीवरून दोघे कोथरूडच्या दिशेने जात होते. दुचाकीचा वेग जास्त असल्याने कर्वेनगर येथील उड्डाणपूल संपत आल्यावर उड्डाणपूलाच्या कठड्याला जोरात बसली. या अपघातात दोघांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी पोलिसांना दिली. कर्वेनगर पोलिस चौकीच्या समोर कोथरूड बाजूस घटनास्थळ आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या कर्वेनगर चौकीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रुग्णावाहिका बोलावून दोघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.















