वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्तांचे आदेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशाने बोराडेनगर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशानुसार आता बोराडेनगर येथील कमेला चौक ते कुमार गुलमोहर सोसायटी मेन गेटपर्यंत रोडच्या पूर्व बाजूस पूर्ण पार्किंग आणि रोडच्या पश्चिम बाजूस पूर्ण नो पार्किंग करण्यात आली आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबतचे असलेले निर्बंध रद्द समजण्यात आले आहेत.
सदर आदेशात म्हटले आहे की, ज्याअर्थी पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून पुणे शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका.इ.) खेरीज हा आदेश लागू करण्यात आला आहे.
