२०१९ मधील 214 जागांसाठीची जाहिरात : २२ सप्टेंबरपासून ई-मेलवर प्रवेशपत्र उपलब्ध होणार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१४ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरतीकरिता २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीविषयक लेखी परीक्षा दि. ०५ ऑक्टोबर २०२१ होणार असून, प्रवेशपत्र २२ सप्टेंबरपासून ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१४ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरतीकरिता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यांची लेखी परीक्षा दि. ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) दिनांक २२ सप्टेंबर २०२१ पासून त्यांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच सदरचे प्रवेशपत्र https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरूनदेखील डाऊनलोड करता येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे.
हे आहेत हेल्पलाईन नंबर…
उमेदवारांना प्रवेशपत्र (HALL TICKET) डाऊनलोड करताना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी खालील नमूद दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकावर (हेल्पलाईन नंबरवर) संपर्क साधावा.
मदतीसाठी संपर्क क्रमांक:- ९६९९७९२२३०/८९९९७८३७२८/९३०९८६८२७०
नियंत्रण कक्ष, पुणे शहर : ०२०-२६१२२८८०/०२०-२६१२६२९६
या पद्धतीने हॉल तिकीट डाउन लोड करा…
- उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेलवर हॉल तिकीट डाउनलोडलिंक पाठवली जाईल. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
- खाली दिलेली लिंक क्लिक करून युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन मधून हॉल तिकिट डाउनलोड करा.
https://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone - खाली दिलेल्या लिंक वरील “डाउनलोड हॉल तिकिट” या बटनावर क्लीक करून ऍडमिटकार्ड डाउनलोड करण्यासाठी अॅप्लिकेशन आयडी / आधारकार्ड नंबर / मोबाईल नंबर / ईमेल आयडी आणि जन्म तारीख अर्जात भरल्या प्रमाणे प्रविष्ट करून हॉल तिकिट डाउनलोड करा.
https://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone
पोलीस भरती २०१९ची ठळक वैशिष्ट्ये…
१. संपूर्ण राज्यभरात पोलीस भरती २०१९ मधील पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणारा लेखी परीक्षेचा टप्पा हा प्रथमच मैदानी चाचणीच्या अगोदर घेण्यात येत आहे.
२. यापूर्वी लेखी परीक्षेचा टप्पा हा पोलीस दलामार्फत घेण्यात येत होता. परंतु यावर्षी प्रथमच खाजगी यंत्रणेकडून (OMR VENDOR) यांच्या मार्फत लेखी परीक्षेचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.
३. सदर लेखी परीक्षेचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी . प्रायव्हेट लिमिटेड या OMR VENDOR ची नियुक्ती करण्यात आली आहे.
४. लेखी परीक्षेकरिता आवश्यक असलेले प्रवेशपत्र (HALL TICKET) सर्व उमेदवारांना अदा करण्याची जबाबदारी ही OMR VENDOR यांच्यावर आहे. ५. सदरची लेखी परीक्षा ही पुणे शहर व आसपासच्या परिसरातील वेगवेगळया परीक्षा केंद्रांवर ( शाळा/महाविद्यालयामध्ये) घेण्यात येणार आहे.
६. लेखी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता परीक्षा केंद्रांवर व परीक्षा हॉलमध्ये CCTV बसविण्यात येणार असून Video Shooting जाणार आहे.
७. कोव्हीड-१९ चे पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असून प्रत्येक उमेदवारांमध्ये ४ फुट इतके अंतर ठेऊन उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
८. उमेदवारांची लेखी परीक्षा ज्या परीक्षा केंद्रामध्ये होणार आहे त्या परीक्षा केंद्राची माहिती, परीक्षा केंद्र येथे कोव्हीड- १९ व परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांनी घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती स्थानिक वर्तमानपत्राद्वारे व पुणे पोलीस संकेतस्थळावर प्रसिध्दी देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या सुचना हया उमेदवारांना अदा करण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रावर (HALL TICKET) वरसुद्धा नमूद करण्यात येणार आहेत.
