सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : चार गुन्ह्यांतून एक लाख रुपयाचां मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईतास ताब्यात घेण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून घरफोडीच्या दोन आणि वाहनचोरीच्या दोन अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करून, एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सिंहगड पोलीस स्टेशनकडील तपासपथकातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस स्टेशन हददीत गस्तीवर असताना जोगेश्वरी मिसळ डीएसके रोड येथे आले असता पोलीस रेकॉर्डवरील आरोपी प्रथमेश ऊर्फ बाब्या अनिल हजारे (वय १९, रा. नांदेडफटा पुणे, मूळ रा. मु.पो.जाळगेवाडी ता. पाटण जि. सातारा) हा त्यांना पाहून पळून जाऊ लागला असता, त्याला पकडून अधिक सखोल चौकशी केली असता, त्याने बेनकर वस्ती धायरी पुणे व नवकर वस्ती नऱ्हे येथे दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचे कबूल केले, तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याच्या ताब्यात दोन दुचाकी मिळून आल्या. सदर दुचाकीबाबत माहिती घेतली असता एक दुचाकी, मोबाईल फोन हे त्याने डीएसपी वाईन्स नऱ्हे येथून चोरल्याचे आणि दुसरी दुचाकी ही मार्केट यार्ड येथील पार्किंग येथून चोरी केल्याचे सांगितले. सदरबाबत दोन्ही पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीकडून वरील चोरीची एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार आबा मोकाशी, शंकर कुमार, विकास बांदल, सचिन माळवे, किशोर शिंदे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे, सागर भोसले, सुहास मोरे, शैलेश नेहरकर, इंद्रजित जगताप, विकास पांडोळे यांच्या पथकाने केली आहे.
