गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : तीन वाहनांसह साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार नसलेल्या आणि मालासहित तीन टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली असून, तीन वाहनांसह एकूण साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीतुन सुमारे सात दिवसांपूर्वी कोबंड्याचे अंड्यांनी भरलेला चारचाकी टेम्पो चोरीस गेलेला होता, तसेच त्यापूर्वीदेखील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून टेम्पो चोरीस गेलेले होते. युनिट पाच गुन्हे शाखेकडून त्या टेम्पोचा शोध घेत असताना पोलीस हवालदार आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, गायकवाड यांनी १० कि.मी.च्या आजूबाजूचे सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले.
त्यातून आरोपी जावेद रफीक खान (वय ३८, रा. कोंढवा, पुणे) याने टेम्पो चोरल्याची खात्री झाल्याने त्यास सापळा रचून गोकुळनगर बस स्टॉप, कोंढवा पुणे येथे ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कौशल्यपूर्व तपास करता त्याने आणखीन वर्सोवा (मुंबई) व कोंढवा येथून असे अजून दोन टेम्पो चोरल्याचे व कोंढवा पिसोळी येथील मोबाईलचे दुकान फोडल्याचे तसेच पिकअप जिपच्या स्टेपण्या चोरल्याची कबुल दिली.
आरोपीकडून घरफोडीचा एक व वाहनचोरीचे तीन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपीचे कोणतेही पूर्व रेकॉर्ड नाही.
ओरोपीकडून एक टाटा एस कंपनीचा चारचाकी टेम्पो व त्यामधील अंडी, पिकअफ जिपच्या सात स्टेपन्या, एक टाटा कंपनीचा ए. सी. ई. ई. एक्स मॉडेलचा चार चाकी टेम्पो, एक थ्री व्हिलर पॅगो टेम्पो आणि चोरीचे मोबाईल फोन व ॲक्सेसिरीज असा मिळून ११,५०,००० रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अमंलदार रमेश साबळे, दया शेगर, चेतन चव्हाण, आश्रुबा मोराळे, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दीपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.
