वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कर्वेनगर भागातील नागरिकाची फसवणूक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लंपास केले. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याचे काम सुरू आहे. तुम्ही माहिती दिली नाही, तर तुमचे सीमकार्ड बंद पडेल, असे सांगून चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन टीमव्ह्यूअर क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून ४९ हजार ९५० रुपये लांबविले.
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अमृत मराठे तपास करत आहेत.
